सिग्नल मिळेल मिळेल असं वाटत असतानाच माझा सिग्नल जातो. पुन्हा सिग्नल मिळायला १२० सेकंदं आहेत हे बघून मी जरा निवांत होते. एकूण ट्रॅफिकची अवस्था पाहता घरी पोचायला बराच वेळ लागणार हे माझ्या लक्षात येतं. मी पिशवीतला बिस्किटचा पुडा काढून पिल्लूच्या हातात देते. ती त्यातलं एक बिस्कीट कढून खायला सुरुवात करते.
"आई, का थांबलोय आपण?"
"सिग्नल लाल आहे ना पिल्लू, म्हणून थांबलोय."
" कधी जायचं मग?" पिल्लूचे एका मागोमाग एक प्रश्न सुरू होतात.
"समोरचा लाल दिवा आहे न, तो हिरवा झाला की जायचं."
"आई, पण लाल दिवा हिरवा कसा होईल? " तिचा प्रश्न ऐकून आता मला हसू येतं.
" लाल दिवा हिरवा नाही ग होत राणी, दुसरा हिरवा दिवा आहे तो लागतो." मी सांगते.
इतक्यात पिल्लूच्या बाजूच्या खिडकीपाशी एक आठ दहा वर्षाची मुलगी गुलाबाची फुलं विकायला येते. खिडकीपाशी पिल्लूला बघून तिच्या चेह-यावर हसू येतं. ती पिल्लूला टिचक्या वाजवून दाखवते.
"आई, ती बघ ताई" पिल्लू म्हणते.
"हं" माझा स्वर जरा त्रासिक झाल्याचं मला जाणवतं. मी जरा नाराजीनेच त्या मुलीकडे नीट पाहते. अनपेक्षितपणे ती मुलगी अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित असल्याचं मला जाणवतं. तिची नजर पिल्लूच्या बिस्किटाकडे आहे असं मला वाटतं. मी पिशवीतला दुसरा बिस्कीटचा पुडा काढून तिच्या हातात ठेवते ती मुलगी पुन्हा गोड हसते.
तितक्यात सिग्नल सुटतो. ती मुलगी जाण्यासाठी वळते. अचानक मागे वळून हातातली गुलाबाची फुलं पिल्लूच्या मांडीवर ठेवते. आणि तिला टाटा करून निघून जाते.
तिच्या ह्या कृतीने अवाक झालेली मी मात्र गाडी सुरू करायचीच विसरून जाते!!